प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल आणि प्रयागराज दरम्यान पूर्णतः आरक्षित अतिजलद साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार:
01904 पनवेल-प्रयागराज विशेष दि. १३.१२.२०२१ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित असलेली विशेष ट्रेन आता दि. ३.१.२०२२ पर्यंत चालविण्यात येईल.
01903 प्रयागराज- पनवेल विशेष दि. १२.१२.२०२१ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित असलेली विशेष ट्रेन आता दि. २.१.२०२२ पर्यंत चालविण्यात येईल
वेळ, संरचना आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण: पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या क्रमांक 01904 च्या विस्तारित फे-यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १५.१२.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल