रत्नागिरी (आरकेजी) : चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम काँग्रेसवासी होणार असून २२ नोव्हेंबर राजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल, अशी माहिती श्रीकृष्ण खेडेकर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये कदम यांनी प्रवेश केला होता. मात्र वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी भाजपलाही सोडचिट्ठी दिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असून २२ नोव्हेंबर रोजी ते पक्षात प्रवेश करतील. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे जिल्ह्याची कोणती जबाबदारी देण्यात येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.