मुंबई, (निसार अली) : मतदानासाठी वापरण्यात येणार्या इव्हीएम मशीनविरोधात उद्या मंगळवारी( ता. २१) सकल ओबीसी समाज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. दुपारी २ ते ५ या दरम्यान निदर्शने करण्यात येतील, असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
इव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेचा वापर करा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणा, अशी मागणी समाजान केली. तसेच येत्या काळात राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा सकल ओबीसी समाज कांचन नाईक व वैशाली महाडिक यांनी दिला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येन आंदोलनस्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.