मुंबई : देशभरातील पाच महिलांनी एकत्र येत ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज लि.’च्या (बीकेटी) सहयोगाने ४ जून रोजी माऊंट एव्हरेस्ट सर केले. वैयक्तिक स्तरावर एखाद्या उत्साही गटाला ‘बीकेटी’ने यशस्वी साथ देण्याची ही पहिलीच वेळ होती.
महिला सक्षमीकरणासाठी ‘बीकेटी’ने महिलांच्या या एव्हरेस्ट मोहिमेला पाठबळ दिले. ‘युनिफाइड व्हाइस फॉर इक्विटी’ हे ‘स्लोगन’ या मोहिमेसाठी निवडण्यात आली होती. या महिलांनी काठमांडू, नेपाळ येथून एव्हरेस्ट शिखराच्या चढाईसाठी ५ एप्रिल ला सुरुवात केली.
एव्हरेस्ट मोहिम ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक अवघड रस्तेचढाई मोहिम म्हणून गणली जाते. ‘टीम’मध्ये रोशा बासनेट, प्रिया लक्ष्मी कार्की, कल्पना महाराजन, रोजिता बुद्धाचार्य, बीपी कोईराला आणि देऊराली चामलिंग या महिलांचा समावेश होता. या मोहिमेसाठी संबंधित ‘टीम’ला अतोनात कष्ट सोसावे लागले. मात्र जीवावर बेतणाऱ्या संकटांवर मात करून या महिलांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.
‘बालकृष्ण इंडस्ट्रीज लि.’चे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार म्हणाले, “दृढता आणि समान संधी उपलब्ध केल्यास अशक्य तेही साध्य होऊन आपली अपेक्षापूर्ती होते यावर आमचा विश्वास आहे. उद्योग, समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये महिलाशक्तीचा मोठा वाटा असूनही त्याची आजवर फारशी दखल घेण्यात आलेली नाही. मात्र आपल्या आयुष्यात या महिलाशक्तीच्या या अजोड भूमिकेची दखल
घेण्यासाठी आम्ही हे पाठबळ दिले. तसेच महिलांना समान संधीच्या दृष्टीनेही हा उपक्रम आखण्यात आला. या महिलांनी आपला दैनंदिन दिनक्रम तसेच ‘कम्फर्ट झोन’बाजूला ठेवून एव्हरेस्ट शिखर सर केले.”
‘बालकृष्ण इंडस्ट्रीज लि.’ (बीकेटी) ही कंपनी ‘ऑफहायवे’ टायरनिर्मितीमध्ये अग्रेसर असून तिचे मुख्यालय मुंबईत आहे. कृषी, बांधकाम, औद्योगिक, बंदरे, एटीव्ही, बागकाम आणि खाणकामाचे काम करणाऱ्या वाहनांसाठी टायर्स बनविण्याचे काम ही कंपनी करते. त्यामुळेच ‘ऑफ हायवे’ टायरनिर्मितीमध्ये जागतिक स्तरावरील काम करणारी ही एक प्रख्यात कंपनी बनली असून तिने या क्षेत्राची सहा टक्के एवढी
बाजारपेठ व्यापली आहे. या कंपनीची विक्री उलाढाल ८५ कोटी डॉलर्स एवढी असून गेल्या पाच वर्षांमध्ये त्यात दरवर्षी ३० टक्क्यांची भर पडली आहे.