मुंबई : भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर चार टर्मिनल चालवणाऱ्या एस्सारच्या पोर्ट बिझनेसने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कार्गो व्हॉल्युममध्ये 23.5% वाढ साध्य केली आहे, तसेच थ्रुपुट 49.22 मिलिअन टन्स (एमटी) आहे.
चौथ्या तिमाहीतील कामगिरीच्या बाबतीत, टर्मिनलनी कार्गोमध्ये 4.63% वाढ साध्य केली व 11.08 एमटी थ्रुपुटची नोंद केली.
वार्षिक कामगिरी
FY20 (एमटी) | FY19 (एमटी) | वाढ (%) | |
50 MTPA हझिरा टर्मिनल | 25.42 | 23.91 | 6.32 |
24 MTPA वायझॅग टर्मिनल | 12.87 | 9.6 | 34.06 |
20 MTPA सलाया टर्मिनल | 5.96 | 2.15 | 177.21 |
16 पॅरादीप टर्मिनल | 4.97 | 4.21 | 18.05 |
एकूण | 49.22 | 39.87 | 23.5 |
चौथ्या तिमाहीतील कामगिरी
Q4 FY20 (एमटी) | Q4 FY19 (एमटीमध्ये) | वाढ (%) | |
50 MTPA हझिरा टर्मिनल | 5.47 | 6.07 | – |
24 MTPA वायझॅग टर्मिनल | 2.98 | 3.03 | – |
20 MTPA सलाया टर्मिनल | 1.37 | 0.52 | 163.46 |
16 MTPA पॅरादीप टर्मिनल | 1.26 | 0.97 | 29.90 |
एकूण | 11.08 | 10.59 | 4.63 |
कामगिरीविषयी बोलताना, एस्सार पोर्ट्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव अग्रवाल यांनी म्हटले: “ऑपरेशन्समधील कार्यक्षमता वाढवणे आणि शक्य तितके चांगले ऑपरेशन्स राबवणे, यावर आम्ही लक्ष केंद्रित केल्याने आम्हाला चांगली वाढ साध्य करण्यासाठी मदत झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडींमध्ये वाढ झाल्याने आम्हाला या क्षेत्रातील सरासरी वाढीचा दर सातत्याने मागे टाकण्यासाठी मदत झाली आहे. कोविड-19चे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपायांमुळे आमच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या मर्यादा निर्माण झाल्या असल्या तरी आमच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करण्यात आलेले असल्याने आमच्या प्रकल्पांना कार्य व ग्राहकांना दिली जाणारी सेवा यामध्ये सातत्य राखणे शक्य झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पांना देशाच्या कार्गो हँडलिंग गरजा पूर्ण करणेही शक्य झाले.”