मुंबई : भारतातील काही राज्यांत लॉकडाउन वाढल्यामुळे समाजातील उपेक्षित घटकांचे आधीपासून होत असलेले हाल आणखी तीव्र होणार असल्याचे लक्षात घेत 14 अब्ज डॉलर्सच्या एस्सार समूहाचा सीएसआर विभाग असलेल्या एस्सार फाउंडेशनने अन्नदानाचा आपला उपक्रमही विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यापूर्वी 1.25 दशलक्ष जेवण वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता व आता ही संख्या 2 दशलक्षांपर्यंत वाढवण्यात आली असून गरजूंना या अन्नाचे दान केले जाणार आहे.
फाउंडेशनने आतापर्यंत समाजातील वंचित घटकांना 8 लाख जेवणाचे वाटप केले असून त्यात बेघर, रोजंदारीवर काम करणारे, तृतीयपंथी आणि घरगुती हिंसेची पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया यांचा समावेश आहे. यापैकी दररोज 20 हजार जेवण महाराष्ट्र रिलीफ फंडासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या जेवण वाटपाशिवाय एस्सार फाउंडेशनने कोव्हिड- 19 मदत कार्यासाठी पुढील गोष्टींचे दान केले आहे.
– हॉस्पिटल्स, पोलिस स्थानके आणि बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी 15,000 मास्क (एन 95 आणि 3प्लाय) आणि सॅनिटायझर्सचे दान
– हॉस्पिटल्स आणि पोलिस स्थानकांसाठी 5000 पीपीई
हे साहित्य या साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्यात तसेच गुजरात, पश्चिम बंगाल आणि तमिळ नाडू येथे सर्वत्र वाटले जात आहे. कोव्हिड- 19 चा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण मुंबईक फाउंडेशनने काही सरकारी व खासगी हॉस्पिटल्स तसेच पोलिस स्थानकांना आवश्यक वैद्यकीय साहित्याचे वाटप केले आहे.
‘भारतातील आघाडीची कॉर्पोरेट या नात्याने आम्ही करत असलेले प्रयत्न वाढवण्याची गरज दिसून आली. लॉकडाउन वाढवल्यामुळे समाजातील वंचित घटकांवर होत असलेला परिणाम आणखी तीव्र होणार आहे. त्यांना आत्ता आपल्या पाठिंब्याची गरज आहे. सुदैवाने महाराष्ट्र सरकार करोना नियंत्रण सीएसआर समूहाशी आमचे चांगले संबंध असल्यामुळे राज्य यंत्रणेच्या मदतीने त्वरित कार्यवाही करणे आम्हाला शक्य आहे. एस्सार कोव्हिड- 19 रिलीफ फंड अशाप्रकारे सातत्याने पॅन भारतातील वंचित व उपेक्षित घटकांना मदत करत राहील,’ असे एस्सार फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूहाचे अध्यक्ष- कॉर्पोरेट एचआर श्री. कौस्तुभ सोनाळकर म्हणाले.
गेल्या 50 वर्षांत एस्सारने आपल्या कामकाजाच्या आसपासच्या परिसरासाठी सातत्याने कल्याणकारी कामे केलेली आहेत. 2011 पासून एस्सार फाउंडेशन परस्परसहकार्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने समाजोपयोगी काम करत आहे. कंपनीचे उपक्रम शेयर्ड व्हॅल्यूच्या संकल्पनेपासून प्रेरित आहेत, तर उर्जा, पायाभूत सुविधा, धातू आणि खाणकाम, सेवा आणि तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील आपल्या कामाद्वारे एस्सार ज्या समाजासाठी काम करत आहे, त्यांच्यासाठी सर्वसमावेशक वातावरण तयार करण्याचे एस्सारचे ध्येय आहे.
स्थानिक प्रशासन आणि ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने आज फाउंडेशन आठ राज्यांतील 500 गावांतील 500,000 लोकांपर्यंत पोहोचले असून फाउंडेशनने तेथे महिला सबलीकरण, अर्थार्जन आणि उद्योजकता, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा आणि स्वच्छता अशा क्षेत्रांत काम केले आहे.