मुंबई : भारतातील कॅन्सर रुग्णांतील पोषणमूल्यांच्या कमतरतेबद्दलच्या सबळ संशोधनाच्या पार्श्वभूमीवर; एस्परर बायोरिसर्चने मुंबई येथे 2 हेल्थ सप्लिमेंट दाखल केली आहेत – एस-फोर्टिटुड (पोषण, संरक्षण व रिकव्हरी) व एस-इन्व्हिगर (बेस फॉर्म्युला). जगभरातील रुग्णांना उत्तम प्रकारे जगता यावे, यासाठी कॅन्सर आजारावरील उपचारातील मुख्य थेरपीची परिणामकारकता वाढवणे, हे या सप्लिमेंटचे उद्दिष्ट आहे.
कॅन्सरची जसजशी प्रगती होते तसातसा कॅकेक्सिया या महत्त्वाचा सिंड्रोमही वाढत जातो. त्यामुळे रुग्णाच्या जीवनाला धोका पोहोचू शकतो आणि अशक्तपणा व मृत्यू हे न टाळण्यासारखे परिणाम होतात. हायपरमेटॅबोलिझम हे कॅन्सर कॅकेक्सियाचे क्लिनिकल व बायोलॉजिकल लक्षण आहे आणि मेटॅस्टॅटिक कॅन्सर रुग्णांमध्ये अल्पकाळ जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे, उपचार, उपचारादरम्यान व रिकव्हरीच्या दरम्यान या टप्प्यांसाठी शरीर तयार करणे गरजेचे आहे. हे तीनही टप्पे निरनिराळे असतात आणि त्यांना शरीरातील पेशींच्या बायोलॉजीनुसार पोषण गरजेचे असते.
बायोव्हॅली इन्क्युबेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रिस्पॉन्सिबल न्यूट्रिशन असोसिएशनचे संस्थापक अमित श्रीवास्तव यांनी सांगितले, “एकूण बॉडीवेटपैकी 25 – 30% घटले की कॅन्सर कॅकेक्सिया असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होतो. ट्युमरच्या प्रकारानुसार, 30 ते 80% कॅन्सर रुग्णांमध्ये वजन कमी होते. केमोथेरपीमुळे निर्माण झालेल्या अॅनिमियाच्या घटना ग्रेड 1 व 2 अॅनिमियासाठी 100% आणि ग्रेड 3 व 4 साठी 80% इतक्या अधिक असतात. बहुतेकशा कॅकेक्सियाचे व्यवस्थापन रुग्णांना ओरल व रिलेस ट्युब याद्वारे उच्च व्हे प्रोटिन कान्सन्ट्रेट लोड देऊन केले जाते. भारतातीयांचे पोट हाय प्रोटिन लोड पचवण्यासाठी साजेसे नसल्याने सध्याच्या व्हे प्रोटिन लोडमुळे जुलाब होतात व अमिनो असिडच्या रुपात डायजेस्टेड प्रोटिनच्या बाबतीत तडजोड केली जाते. पोटाची शोषून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने केमोथेरपीच्या दरम्यान ही गंभीर वैद्यकीय चिंता ठरते. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये आयात केलेले किंवा परदेशी फॉर्म्युला असणारे प्रोटिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे व ते कॉकेशिअन गटशी जुळते. भारतीयांच्या पोटाबाबत समस्या सोडवण्याच्या बाबतीत कमतरता आहे – जीआय सिस्टीमवर अधिक ताण न आणता रुग्णांना कॅकेक्सियामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी मदत करेल अशा शास्त्रीय उत्पादनाची आवश्यकता. कॅकेक्सिया रोखण्यासाठी व केमो लोड कमी करण्यासाठी भारतीय पोटासाठी उपयुक्त ठरेल, असा शास्त्रीय फॉर्म्युला तयार करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या बायोव्हॅली इन्क्युबेशन कौन्सिलमध्ये एस्पररला कॅन्सर थेरपीमध्ये साह्यकारी न्यूट्रिशन कंपनी म्हणून गौरवण्यात आले.”
संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रक्तिम चट्टोपाध्याय यांनी सांगितले, “कॅन्सर रुग्णांना चांगल्या प्रकारे जगता यावे, यासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन आणण्यासाठी “पर्सनलाइज्ड मेडिसिन” महत्त्वाचे आहे. पोषणातील असमतोलाचा थेट परिणाम कॅन्सर आजारावर होतो आणि कॅन्सर रुग्णांमधील पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या जोखमीव उपाय करणे, हा आमचा प्रयत्न आहे.”
बेंगळुरूतील यूएस-एफडीए मान्यताप्राप्त न्यूट्रास्युटिकल प्रकल्पात उत्पादन करून; कंपनी संशोधन करत आहे व कॅन्सर रुग्णांना ओन्को-न्यूट्रिशन थेरपी देत आहे. पाहणीनुसार, पुरुषांमध्ये आढळलेल्या आघाडीच्या तीन कॅन्सर प्रकारांमध्ये लंग कॅन्सरचा सातत्याने समावेश राहिला आहे. सॅटेलाइट रजिस्ट्रेशन एरियाच्या तुलनेत मुंबईतील इन्सिडंट रेट बराच अधिक आहे (मुंबईमध्ये प्रति 100,000 साठी 10.3, या तुलनेत सॅटेलाइट एरियात प्रति 100,000 साठी 5.6 ते 6.9). पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारे कॅन्सर प्रकार वेगवेगळे आहेत व त्यामध्ये साधारणतः प्रोस्टेट, तोंड, लॅरिंक्स, इसोफेगस यांचा समावेश आहे.
महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचा इन्सिडन्स रेट सातत्याने सर्वाधिक राहिला आहे. हा दर अन्य सॅटेलाइट कव्हरेज एरियाच्या तुलनेत मुंबईतही अधिक राहिला आहे (मुंबईमध्ये प्रति 100,000 साठी 33.4, या तुलनेत सॅटेलाइट एरियात प्रति 100,000 साठी 16.7 ते 29.1). कर्व्हिकल व ओव्हरिअन कॅन्सर यांचे प्रमाण सर्व प्रदेशांमध्ये अनुक्रमे दुसरे व तिसरे आहे, परंतु इन्सिडन्स रेटमध्ये तफावत आहे. कर्व्हिकल कॅन्सर होण्याचे प्रमाण मुंबईपेक्षा सॅटेलाइट रजिस्ट्रीमध्ये अधिक आहे आणि ओव्हरिअन कॅन्सर याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपात आढळतो. एस्परर बायोरिसर्च कॅन्सर रुग्णांसाठी न्यूट्रिशन थेरपी मार्गदर्शक तत्त्वांचे प्रमाणीकरण करण्यासाठी कार्यरत आहे.