मॉरिशस : एस्सार ऑइल लि (ईओएल),एस्सार एनर्जी होल्डिंग्ज लिमिटेड (ईईएचएल) आणि ऑइलबिडको (मॉरिशस) लिमिटेड (ओबीएमएल), दोन्ही कंपन्या मॉरिशसच्या कायद्याअंतर्गत
एकत्र आल्या असून त्यांनी ११ नोव्हेंबर२०१७ रोजी ईओएलच्या पूर्वीच्या सार्वजनिक समभागधारकांनाप्रति शेअर ७६.४१ रुपये
प्रती शेअर देत एकूण ८९१ कोटी रुपयांचे वितरण केले.
ईईएचएल आणि ओबीएमएलद्वारे ईओएलची रॉनसेफ्ट व ट्राफिगराव यूसीपीच्या आघाडीखालील कन्सोर्टियमला ८६ हजार कोटी रुपयांचा विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ही घोषणा करण्यातआली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये माजी प्रमोटर्सनी डिलिस्टिंगएक्झिट ऑफर जाहीर केल्यानंतर आपले शेअर यशस्वीपणे देऊ केलेल्या सर्व समभागधारकांना
प्रती शेअर ७६.४१ रुपयांच्या याअतिरिक्त पेआऊटचा लाभ झाला आहे. ही किंमत ठरवलेल्या ड्यूडेट नंतरच्या क्लोजिंग प्राइजवर प्रती वर्ष १० टक्के व्याजदरानेकाढण्यात आली आहे. यामुळे २०१५ मध्ये ईओएलचे डिलिस्टिंगझाल्यानंतर पूर्वीच्या सार्वजनिक समभागधारकांना देण्यात आलेल्या एकूण ३०६४ कोटी रुपयांमध्ये ८९१ कोटी रुपयांची भर पडली आहे.
१९९५ मध्ये नोंदणीच्या वेळेस ईओलची किंमत दोन हजार कोटीरुपये होती आणि व्यवहारानुसार तिची किंमत आता २४२० टक्केवाढीसह ५०,४०० कोटी रुपयांवर गेली आहे. हे मूल्यवर्धनधोरणात्मक गुंतवणूक आणि व्यवसाय वृद्धीतून साधले गेले आहे.
धनपत नाहटा, संचालक, ईईएचएल म्हणाले, ‘एस्सार एनर्जीने एस्सार ऑइलच्या पूर्वीच्या सार्वजनिक समभागधारकांना पैसे देण्याचा व्यवहार पूर्ण केला आहे. हा आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व गुंतवणूक करणाऱ्या समभागधारकांना बक्षिसदेण्याच्या आमच्या भावनेशी सुसंगत आहे. कित्येकांसाठी आदर्श ठरलेल्या या व्यवहाराचा एक भाग होताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’