मुंबई, २९ जुलै, २०२१: भारतीय ब्रँडेड फॉर्म्युलेशन्सची आघाडीची उत्पादक कंपनी एरिस लाईफसायन्सेस लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष आज घोषित केले.
एकत्रित आर्थिक निष्कर्षांमधील ठळक आकडेवारी:
तपशील
(मिलियन रुपये) |
आर्थिक वर्ष २०२२ ची प्रथम तिमाही | आर्थिक वर्ष २०२१ ची प्रथम तिमाही | दोन वर्षांमधील तुलनात्मक वाढ (%) |
महसूल | ३४९३ | २९३२ | १९.१% |
निव्वळ नफा | २८०४ | २३५७ | १९.०% |
ईबीआयटीडीए | १२६५ | १०४१ | २१.६% |
ईबीआयटीडीए मार्जिन | ३६.२% | ३५.५% | ७४ बीपीएस |
करपश्चात नफा | १०६७ | ८९० | १९.८% |
करपश्चात नफ्याचे मार्जिन | ३०.५% | ३०.४% | १८ बीपीएस |
या निष्कर्षांवर प्रतिक्रिया देताना एरिस लाईफसायन्सेस लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित बक्षी यांनी सांगितले, “आम्ही आमच्या व्यापलेल्या बाजारपेठेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष २०२१ मध्ये लक्षणीय कामगिरी बजावल्यानंतर आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये आमच्या आघाडीच्या ३ प्रमुख थेरपींमध्ये आमची कामगिरी अतिशय सरस ठरली, आमच्या प्रामुख्याने क्रोनिक आणि सब-क्रोनिक पोर्टफोलियोची मजबुती हे याचे प्रमुख कारण आहे. आम्ही असे मानतो की, वेगाने वाढत असलेल्या थेरपींमध्ये मजबूत ब्रँड्स उभारणीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याचे आमचे धोरण आणि अनेक पेटंट संपत असल्यामुळे निर्माण होत असलेल्या संधींमुळे आम्हाला हा वृद्धी आलेख असाच पुढे कायम राखण्यात मदत मिळेल.”
एरिस लाईफसायन्सेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक व मुख्य संचालन अधिकारी श्री. कृष्णकुमार व्ही यांनी सांगितले, “कार्डिओ-मेटॅबोलिक आणि व्हीएमएनमध्ये पॉवर ब्रँड्सचा मजबूत फ्रँचाइज उभारणीवर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे धोरण आमच्या वृद्धीला चालना देत आहे. आमच्या आघाडीच्या १५ प्रमुख ब्रँड्सपैकी १० हे त्यांच्या-त्यांच्या विभागांमध्ये पहिल्या पाच स्थानांवर आहेत. या तिमाहीमध्ये आम्ही झोमेलीस एसजी, रेमिलिन डीएक्स आणि झॅक डे ही ३ नवी उत्पादने यशस्वीपणे बाजारपेठेत दाखल केली. झोमेलीस आणि ग्लुक्सीट ही आमची नवीन डायबेटीस उत्पादने बाजारपेठेतील रँक्स आणि मोठ्या प्रमाणावर वाढ यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. पुढील ४-५ वर्षात स्वाभाविक वाढीचा अतिशय उत्तम काळ आमच्यासमोर आहे, पॉवर ब्रँड्स फ्रँचाइजचे एकत्रीकरण, नवी उत्पादने दाखल करण्याच्या योजना, फिजिशियन्स कव्हरेजचा विस्तार आणि थेरपीजमध्ये वैविध्यता असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. इन-लायसेन्सिंग आणि अधिग्रहण संधींमध्ये अनेक लाभ मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत जेणेकरून आमच्या स्वाभाविक वृद्धी उपक्रमांसाठी ते पूरक ठरू शकेल.”
आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
- महसूल मागील वर्षीपेक्षा १९.१% वाढून ३४९३ मिलियन रुपये नोंदवला गेला; ब्रँडेड फॉर्म्युलेशन्स महसूल मागील वर्षीपेक्षा १९.६% वाढून ३१४४ मिलियन रुपयांवर पोहोचला.
- ईबीआयटीडीए मागील वर्षीपेक्षा २१.६% वाढून १२६५ मिलियन रुपये झाला.
- करपश्चात नफा १०६७ मिलियन रुपये, मागील वर्षीपेक्षा १९.८% वाढ
- संचालक मंडळाने प्रति समभाग ६.०१ अंतरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे.
- उत्पादन विस्तार योजना: आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरपर्यंत नवीन प्लांट सुरु केला जाणार असून त्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल.
आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीतील व्यावसायिक कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
- महसुलामध्ये ८८% योगदान देणाऱ्या पहिल्या ३ थेरपीजमध्ये बाजारपेठेपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावली.
- महसुलाचा ९२% भाग असलेल्या क्रोनिक आणि सब-क्रोनिक थेरपीजमध्ये बाजारपेठेपेक्षा चांगली कामगिरी बजावली.
- आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीतील प्रमुख नवीन उत्पादने:
- झोमेलीस एसजी: रेमोग्लीफ्लोझिन+विल्डग्लीप्तिन
- रेमिलिन डीएक्स: ड जीवनसत्व+मेथिलकोबालामीन बाजारपेठेतील आमचे उत्पादन
- झॅक डे: आमच्या आधीच्या झॅक डी चे कमी डोस असलेले व्हर्जन
एरिस लाईफसायन्सेस लिमिटेड (बीएसई: 540596, एनएसई: ERIS)
एरिस लाईफसायन्सेस लिमिटेड ही संपूर्णपणे देशांतर्गत ब्रँडेड फॉर्म्युलेशन बिझनेस मॉडेल असलेली एकमेव सार्वजनिकरित्या सूचिबद्ध भारतीय फार्मा कंपनी आहे. २००७ साली स्थापन करण्यात आलेली एरिस ही आयपीएम टॉप-२५ मधील सर्वात नवीन कंपनी आहे. सुरुवातीपासूनच आम्ही क्रोनिक आणि सब-क्रोनिक लाइफस्टाइल संबंधी थेरपी आणि हाय-एन्ड सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर्स व कन्सल्टिंग फिजिशियन्सवर लक्ष केंद्रित केले आहे.
आमचा व्यवसाय संपूर्णपणे एकीकृत असून गुवाहाटी येथे डब्ल्यूएचओ जीएमपी उत्पादन सुविधा आहे जिचे आमच्या महसुलातील योगदान ≈८०% आहे. याशिवाय संपूर्ण देशभरात आमचे २१०० पेक्षा जास्त स्टॉकिस्ट्स आणि ५,००,००० पेक्षा जास्त केमिस्ट्स आहेत. अहमदाबाद व मुंबईतील आमची कॉर्पोरेट ऑफिसेस, प्रत्यक्ष बाजारपेठ आणि आमच्या गुवाहाटी येथील कारखान्यात ४००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
आमच्या महसुलात गेल्या दहा वर्षात (आर्थिक वर्ष २०११ पासून) ६ पटींनी तर गेल्या पाच वर्षात (आर्थिक वर्ष २०१६ पासून) २ पटींनी वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षात आमचा एकूण नफा ~१७ पट वाढला आहे तर गेल्या ५ वर्षात तो २.६ पट वाढला आहे. गेल्या १२ वर्षात कंपनीने ~३०% पेक्षा जास्त आरओआयसी कायम राखले आहे. गेल्या १४ वर्षात या कंपनीने क्रोनिक आणि सब-क्रोनिक फोकस्ड ब्रँड पोर्टफोलिओ (विक्रीचा ९१% हिस्सा), कमी एनएलईएम एक्स्पोजर (७%), सुपरस्पेशलिस्ट्ससोबत हाय माईंड शेअर आणि प्रिस्क्रिप्शन रँक्स (#३ डायबेटॉलॉजिस्ट, #४ कार्डिओलॉजिस्ट), मजबूत रोख प्रवाह (आर्थिक वर्ष २०२१ च्या ईबीआयटीडीएच्या ८१% फ्री कॅश) आणि ३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार कर्जमुक्त बॅलन्सशीट या सर्व संदर्भात पायाभूत मजबुती कायम राखली आहे.