मुंबई : पर्यावरण सुरक्षेचा प्रसार करण्यासाठी पोगो या वाहिनीने भामला फाउंडेशनच्या सहयोगाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला. यावेळी पोगो किड्स चैनल पर्यावरण सुरक्षेचे अभियान राबविले. प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.
या अभियानला २५० लहान मुले आणि बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्तींचे समर्थन मिळाले. लोकप्रिय कार्टून्स, उत्साही लहान मुलांसोबत आणि भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला सोबत शान, अरमान मलिक, सिद्धांत कपूर, तनिशा मुखर्जी, शामक डावर आणि आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.भीम, चुटकी, टॉम एंड जेरी या कार्टून पात्रांनी टिक टिक प्लास्टिक या गाण्यावर विशेष नृत्य प्रदर्शनच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर करू नका, असा संदेश दिला.