मालाड, प्रतिनिधी- येथे आम आदमी पार्टी च्या वतीने सिलेंडर ची मयत यात्रा काढून वाढत्या महागाई विरोधात मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा बाजी करत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दात टीका केली. या मोर्चात गॅस सिलेंडर ची मयत यात्रा काढून कच्चा रोड महाकाली नगर परिसरात पेट्रोल, डीझल व गॅस च्या वाढत्या किमती विरोधात निषेध व्यक्त केला. या मोर्चात मालाड तालुका प्रभारी लारझी व्हर्गिस, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष नसीम शेख, उपाध्यक्ष फातिमा कुरेशी, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुमित्रा श्रीवास्तव, सुमित सिंग, स्थानिक वॉर्ड क्रमांक 34 चे अध्यक्ष दानिश शेख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.