ठाणे : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणुकीकरिता मतदानाची वेळ २ तासांनी वाढविली आहे. सोमवार २५ जून, २०१८ रोजी मतदानाची वेळ आता वाढीव वेळेनुसार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान केंद्रांची व मतदारांची यादी www.thaneelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी २५३४४१४३ या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा.
ठाण्यात ४५ हजार ८३४ मतदार
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हयातील ठाणे तालुक्यामध्ये एकूण ३० मतदान केंद्र असून एकूण २६ हजार ५६७ इतके मतदार, कल्याण तालुक्यामध्ये एकूण ९ मतदान केंद्र असून एकूण ६६७६ इतके मतदार, भिवंडी तालुक्यामध्ये एकूण ३ मतदान केंद्र असून एकूण ३३०६ इतके मतदार, शहापूर तालुक्यामध्ये एकूण ३ मतदान केंद्र असून एकूण २३४० इतके मतदार, मुरबाड तालुक्यामध्ये एकूण२ मतदान केंद्र असून एकूण १४६९ इतके मतदार, उल्हासनगर तालुक्यामध्ये एकूण ३ मतदान केंद्र असून एकूण १९७९ इतके मतदार, अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण ४ मतदान केंद्र असून एकूण ३४९७ इतके मतदार असे एकूण ५४ मतदान केंद्र असून ४५८३४ इतके मतदार आहेत.ज्या पदवीधर मतदारांनी त्यांचे नाव कोकण पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव नोंदविलेले आहे त्या पदवीधर मतदारांनी दिनांक २५ जून सोमवार रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले नजिकच्या मतदान केंद्रात जावून मतदान करावे असे याव्दारे जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.