मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत राज्यातील चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार एप्रिल रोजी ४५३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
चौथ्या टप्प्यासाठी १७ मतदारसंघात मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नंदूरबार मतदारसंघ १४, धुळे ३७, दिंडोरी १७, नाशिक३२, पालघर २१, भिवंडी २२, कल्याण ३६, ठाणे २९, मुंबई उत्तर २२, मुंबई उत्तर-पश्चिम २७, मुंबई उत्तर पूर्व ३०, मुंबई उत्तर-मध्य २७, मुंबई दक्षिण-मध्य ३०, मुंबई दक्षिण १७, मावळ ३३, शिरुर २७ आणि शिर्डी मतदारसंघात ३२, चौथ्या टप्प्यात २ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चौथ्या टप्प्यातील अर्जांच्या छाननीनंतर अर्ज माघारी घेण्याची मुदत १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.