
रत्नागिरी : विधान परिषद रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीतून दोघांनी अर्ज मागे घेतले आहेत.जैन किशोर ओटरमल आणि आदिती सुनिल तटकरे यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. वरील दोघांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनिल तटकरे आणि शिवसेनेचे राजीव अशोक साबळे यांच्यात विधान परिषद निवडणुकीची लढत होणार आहे.