रत्नागिरी : देवरुख नगरपंचायत निवडणूकिसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्यपदासाठी ३५ तर थेट नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज दाखल झाले. दरम्यान अर्ज दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यावरून गोंधळ निर्माण झाला. याबाबत अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागवले आहे. देेवरुख नगर पंचायत निवडणुकीसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान दाखल झालेल्या अर्जानंतर आता थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ५ तर १७ जागांसाठी एकूण ६९ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.