मुंबई : इजिस समुहाने सन २०१६ मध्ये ९.३% इतकी वाढ नोंदवत १ अब्ज युरोचा (€१.०२०) टप्पा ओलांडला आहे. बाह्य आणि संघटनात्मक पातळीवर इजिसने ही वाढ नोंदवली आहे.
ही वाढ म्हणजे या वर्षात मिळवलेल्या अभियांत्रिकी कामांचे निदर्शक स्वरूप आहे. येत्या २० महिन्यांची ऑर्डर बुक पूर्ण स्थितीत आहे. येत्या वर्षासाठी ही वाढ कंपनीला उभारी देणारी ठरणार आहे. कंपनीचा ईबीआयटीडीएमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. सान २०१५ पासून ६८.५ दशलक्ष युरो ते ७३.१ दशलक्ष युरो इतकी वाढ झाली आहे. २०१५ मध्ये २६.९ दशलक्ष युरो असलेला नेट डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट यावेळी ३०.४ दशलक्ष युरो इतका झाला आहे. इजिसच्या फ्रान्सबाहेरील व्यवसायात +१३.६% वाढ झाली असून भारत, मध्य-पूर्व आणि ब्राझील या देशांमध्ये स्थानिक पातळीवर चालू असलेल्या प्रकल्प कामांच्या आधारे सदर वाढ नोंदवली गेली आहे.