~ विनासायास व किफायतशीर रूफटॉप सोलार फायनान्सिंग सुविधा देणार ~
मुंबई, २६ मे २०२३: इकोफाय या भारतीय रिटेल क्षेत्रातील क्लायमेट फायनान्स तफावतीचे निराकरण करण्यास कटिबद्ध असलेल्या भारतातील ग्रीन-ओन्ली एनबीएफसीने देशभरात सर्वसमावेशक सोलार क्रांतीला चालना देण्याच्या मिशनवर असलेली भारतातील सर्वात मोठी एकीकृत सोलार ऊर्जा कंपनी टाटा पॉवर सोलार सिस्टम्स लि. सोबत सहयोग केला आहे. हा सहयोग ऊर्जेच्या शाश्वत व नैसर्गिक मोड्सचा जागरूकपणे अवलंब करत असलेल्या आधुनिक काळातील ग्राहकांसाठी सोलार रूफटॉप्स, ईपीसी सर्विसेस आणि इतर नवोन्मेष्कारी सोलार उत्पादने यांसारख्या सोलार सोल्यूशन्ससाठी वित्तपुरवठा करण्यामध्ये साह्य करेल.
या सहयोगाचा देशभरात शुद्ध ऊर्जेच्या व्यापक अवलंबतेसाठी मार्ग मोकळा करण्याचा, तसेच सोलार ऊर्जेमध्ये एकसंधी परिवर्तनाला चालना देण्याचा मनसुबा आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी इकोफाय देशातील अग्रगण्य सोलार ऊर्जा प्रवर्तकांकडून विविध अत्याधुनिक सोलार सेवा खरेदी करू पाहणारे व्यक्ती व लहान व्यवसायांना कर्ज देईल, ज्यामुळे निव्वळ शून्य-कार्बन देशासाठी आराखडा रचला जाईल. तसेच, हा सहयोग इकोफायला १५०० हून अधिक इन्स्टॉलेशन्स स्थापित करण्यास आणि महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व गावा या ७ राज्यांमधील ४०० हून अधिक डिलर्स, वितरक, कुटुंबं, व्यावसायिक क्षेत्रे, उद्योगांपर्यंत पोहोचण्यास सक्षम करेल.
इकोफायचे सह-संस्थापक व सीओओ गोविंद शंकरनारायणन म्हणाले, ‘‘रूफटॉफ सोलारची विद्यमान क्षमता जवळपास ९ गिगावॅट आहे, जी पुढील ५ वर्षांमध्ये १५ टक्के सीएजीआरदाने वाढण्याचा अंदाज आहे. प्रयत्नशील सोलार रूफटॉप बाजारपेठ आणि शाश्वत ऊर्जा अवलंबतेप्रती सरकारचा प्रबळ पाठिंबा पाहता या सहयोगाचा लक्षणीय प्रभाव पडेल. टाटा पॉवर सोलार सिस्टम्स लि. उद्योगातील मोठी कंपनी आहे आणि आम्ही सोलार ऊर्जेच्या व्यापक अवलंबतेला चालना देण्यासाठी सहयोगाने काम करण्यास उत्सुक आहोत.’’