पूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर चाळी होत्या. त्यात साधारणपणे ५० ते ६० घरे असायची. चाळ संस्कृती वेगळी होती. माणसे एकटी नसायची. एकमेकांबद्दल आपुलकी असायची. प्रत्येक सुखदुखात ती सहभागी व्हायची. सर्व सण एकत्र साजरे केले जायचे. आता परिस्थिती बदलली आहे. चाळ संस्कृती कमी होऊन तिची जागा फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे.
फ्लॅटमध्ये रहायला आल्यानंतर माणसांचा माणसांशी संवाद तुटू लागला. आपल्या बाजूला कोण राहते? हेही समजेनासे झाले. यामुळे बंद दरवाजा आणि त्यात राहणारी कुटूंबे यांना गुन्हेगारी प्रवृत्तींपासून धोका निर्माण झाला. तो धोका निर्माण होऊ नये आणि रहिवाशांना सुरक्षीत आयुष्य लाभावे, म्हणून क्लासीक बिझनेस कार्पोरेशन गेली २५ वर्षे काम करत आहे. त्यासाठी इंटरकॉम सिस्टीम, सीसीटीव्ही, बायोमेट्रीक, फेस डीटेक्शन या अत्याधुनिक ई-सिक्युरिटी यंत्रणांची माहिती ’क्लासीक’ कडून नागरिकांना मोफत देण्यात येत आहे.
गुन्हा घडलेल्या इमारती आणि गुन्हा न घडलेल्या इमारतीत मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात महत्वाची बाब समोर आली. ज्यात गुन्हा घडला त्या इमारतीत रहिवाशांचा एकमेकांशी फारच कमी संवाद होता तर गुन्हा न घडलेल्या इमारतीतील नागरिकांचा एकमेकांसोबत उत्तम संवाद असल्याचे निदर्शनास आले आहे. हा कमी झालेला संवाद वाढावा, यासाठी ’क्लासीक’ ने यशस्वी प्रयत्न केले. त्यानुसार इंटरकॉम सेवेला प्राधान्य देण्यात आले. या सेवेत एका फ्लॅटची व्यक्ती दुसर्या फ्लॅटमध्ये राहणार्याशी कधीही संवाद साधू शकते तसेच सुरक्षा रक्षकाशी थेट बोलू शकते. या सेवेमुळे सुरक्षीतता लाभण्यास मदत झाली आहे.
सोसायटीत नवख्या माणसाचा प्रवेश होतो, तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्या माणसाचा आणि संबंधित फ्लॅटधारकाचा इंटरकॊमवर संवाद घडवतो, त्यानंतर त्याला जाण्यास परवानगी देण्यात येते. इंटरकॉम सिस्टममुळे पारदर्शकता निर्माण झाली आहे. त्यासाठी ’क्लासीक’ कडून इंटरकॉम सिस्टम बसविण्यात आल्यानंतर सीसीटीवी यंत्रणा मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे संवादाबरोबरच सुरक्षेचे कवच लाभले आहे.
याचसोबत अतिअत्याधुनिक प्रकारच्या सुविधाही पुरवण्यात येत आहेत. ज्यात सोसायटीची लॉबी दरवाजा लावून बंद केलेली असते. येणारे रहिवाशी त्यांचा चेहरा दाखवून किंवा फिंगर ठेवून दरवाजा उघडून आत येऊ शकते. तसेच नवी व्यक्ती आत आल्यावर ती ज्या घरात जाणार तेथे इंटरकॉमवर संवाद साधला जातो. संवाद साधताना इंटरकॉम इन्स्ट्रूमेंटच्या स्क्रिनवर त्या व्यक्तीचा आवाज आणि चेहरा दिसतो. त्यानंतर खात्री झाल्यावर घरातील व्यक्ती सांकेतिक नंबर दाबते व लॉबी उघडली जाते आणि त्या व्यक्तीस प्रवेश मिळतो. अशा प्रकारच्या सुविधा ’क्लासीक’ कडून पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे सोसायट्यांतील रहिवाशांचे जीवन निर्भय बनले आहे.
संपर्क : क्लासीक टेलिकॊम सोल्युशन एल. एल. पी. 9322590613/67200200:.
लेखक : गिरिष मळगावकर,
(लेखक हे मुंबईस्थित उद्योजक आहेत)