
मुंबई : डिजिटल क्रेडिट बाजारातील ख्यातनाम संशोधक असलेलीमुंबई येथील फिनटेक कंपनी ईपेलेटरने अग्रणी भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल मार्केटप्लेस ईजमायट्रिपसह भागीदारी केली आहे. भागीदाराचा भाग म्हणून ईजमायट्रीपवरील सर्व ट्रॅव्हल बुकिंगसाठी ग्राहकांना ईपेलेटरची ‘आता बुक करा, नंतर पेमेंट करा’ सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे ग्राहकांना पेमेंट न करता प्रवासाची बुकिंग करण्यास तिकीट खरेदीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीपर्यंत व्याज-मुक्त क्रेडिटचा लाभ घेता येईल.
ईपेलेटरचे सह-संस्थापक उदय सोमयाजुला यांनी सांगितले की, ‘ईजमायट्रीपसह ईपेलेटरची भागीदारी ट्रॅव्हल क्षेत्रावर आमचे लक्ष केंद्रित आहे याची साक्ष आहे. आम्हाला वाटते की प्रवास विशेषकरून हवाई प्रवासासाठी हा संधीचा क्षण आहे कारण की या क्षेत्रात नवीन विमानतळे आणि वाढती उत्पन्नपातळी मुळे मजबूत वाढीचा सर्वांगिण व दीर्घकाळ चालणारा टप्पा येत आहे. ईपेलेटरची अतिशय सुविधाजनक सेवा आणि इंस्टंट-क्रेडिट सुविधेचे बाजारात स्वागत केले जाईल आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून स्वीकार केला जाईल.”
ही नवीन सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना एकदा ईपेलेटरवर नोंदणी करावी लागेल ज्यामुळे ते क्रेडिट मर्यादा वापरू शकतील. या क्रेडिट मर्यादेचा वापर ईजमायट्रीप पोर्टलवर व्यवहार करण्यास केला जाऊ शकतो आणि व्यवहार फक्त एका टॅपद्वारे पूर्ण होऊ शकतो. तसेच वापरकर्ते सोप्या आणि कमीत कमी ऑनलाइन टप्प्यांद्वारे नंतरच्या तारखेला सहज परतफेड करू शकतात. वापरकर्त्यांसाठी ईपेलेटरचा वापर अधिक सुविधाजनक, जलद आणि सहज का बनतो कारण की त्यांना चेक-आउट प्रक्रियेदरम्यान त्यांचा बँक खाते/कार्ड तपशील टाईप करावा लागत नाही किंवा पेमेंटच्या इतर पद्धती वापरण्याची गरज भासत नाही.














