मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात विजय सिह या तरूणाच्या संशयास्पद मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आज DYFI या युवकांच्या संघटनेने दिला. DYFI ने घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
सदर युवक एका औषध कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करायचा. क्षुल्लक वादावरून त्याला पोलीस ठाण्यात आणून बेदम मारले गेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून पोलीसांवर गुन्हे दाखल करा, सध्या फक्त निलंबीत केल आहे, असे DYFI च्या मुंबई तालुका सचिव तृप्ती मांजलकर यांनी सांगितले. वडाळ्यात लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यावरही पोलीसांनी लाठीचार्ज केला आहे, याचाही आम्ही निषेध करतो, असे मांजलकर म्हणाल्या.