मुंबई, 15 जुलै (निसार अली) : रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात डिवायएफआयने आज अंधेरी येथे आंदोलन केले. डीवायएफआय पश्चिम उपनगर तालुका संघटनेच्या शिष्टमंडळाने अंधेरी रेल्वे स्थानकात रेल्वेच्या वरिष्ठ पदधिकारांची भेट घेऊन रेल्वेच्या खासगीकरणाविरुध्द निवेदन सादर केले.
यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष कॉ. प्रदीप साळवी, तालुका अध्यक्ष कॉ. राहुल अमीन, राज्य कमिटी सदस्य कॉ. लक्ष्मी शामन्थुल, कॉ. मेहबूब पटेल, कॉ. तबरेज सय्यद अली, कॉ. प्रलय पाटील उपस्थित होते.
सामान्य जनता आणि रेल्वे कर्मचार्यांच्या सरकार विरुद्धच्या लढ़यात डीवायएफआय संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच खांद्याला खांदा लावून सोबत उभे आहेत, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच केंद्र सरकार ने हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.