मुंबई, (निसार अली) : डीवायएफआय मालवणी युनिटच्या वतीने रविवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता, मॅरेथॉन घेण्यात आली. तीनशे स्पर्धकांनी यावेळी सहभाग घेतला. स्पर्धा मालवणी म्हाडा गेट क्र. 8 हून सुरू होऊन गेट क्र. 1 येथेपर्यंत घेण्यात आली. स्पर्धेत मनोज आर. यादव हा विजेता ठरला. उपविजेतेपद कुमार एम. तर तिसरा क्रमांक अब्दुल सद्दाम याने पटकावला. विजेत्यांना चषक आणि प्रशस्ती पत्र कॉम्रेड ए. सी. श्रीधरन यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच प्रत्येक स्पर्धकांना टी शर्ट देण्यात आले होते, अशी माहिती मुश्ताक मेस्त्री यांनी दिली. या स्पर्धेला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डीवाएफआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.