
रत्नागिरी : मुंबई तुफान पावसानं तुंबली खरी; मात्र त्याचे पडसाद कोकणात पहायला मिळाले. चाकरमान्यांची लाईफ लाईन ओळखली जाणाऱ्या कोकण रेल्वेला याचा फटका बसला. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर सुटणा-या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या या पनवेल वरुन सोडण्यात आल्या. दादर – रत्नागिरी पँसेंजर, मुंबई सीएसएमटी – करमाळी तेजस एक्सप्रेस आणि दादर -मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मांडवी एक्सप्रेस सकाळी पनवेल वरुन सोडण्यात आली. मत्सगंधा एक्सप्रेस देखील पनवेल स्थानकातून सोडण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला. त्यामुळे कोकणात येणा-या रेल्वे गाड्यांवर पावसाचा परिणाम दिसून येत आहे. कोकणात पाऊस नसल्याने कोकणातील रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमंडलेलं पहायला मिळतं आहे. त्यामुळे गाड्या उशिराने धावत होत्या.














