मुंबई : भारताची आघडीची ऑनलाईन ऑटोमोबाईल बाजारपेठ ड्रूमच्या मालकीची वाहन परिक्षण सेवा असलेल्या इको (ECO) ने भारतातील सर्वात मोठी घरापर्यंत वाहन परिक्षण सेवा पुरवठादार बनण्याचा मार्ग सुकर केला आहे. इको ही भारताची वैज्ञानिक, माहितीवर आधारित आणि व्यापक वाहन तपासणी सेवा आहे. आपल्या व्यासपीठावर १४०० पेक्षा जास्त प्रमाणित निरीक्षक असलेल्या या अग्रणी ऑटोमोबाईल निगडीत ऑनलाईन बाजारपेठेची ५००+ जास्त पिनकोड्सवर उपलब्धता आहे.
ड्रूम ने रु.२५ कोटीच्या निधीची विशेषकरून इको निरीक्षणाच्या बाबतची ध्येय साध्य करण्यासाठी तरतूद केली आहे. या उपायांद्वारे आणि समर्पित प्रयत्नातून ड्रूमचा तपासणी आणि प्रमाणीकरण यात औद्योगिक माणकाचा मापदंड इको देऊ करत असलेल्या सेवेद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दोन महिन्यात ड्रूमने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिसरात स्वतःच्या मालकीच्या आणि चालवण्यात येणाऱ्या मॉडेल्सचा पायलट प्रकल्प यशस्वीपणे चालवला आहे.
ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल म्हणाले की “इकोला मिळत असलेल्या प्रतिसादाने आम्ही आनंदित आहोत आणि आमच्या ग्राहकांना अविरत अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इकोला आम्ही आमच्या बाजारस्थळावर गाड्या विकत घेण्याबाबत आणि विकण्याबाबतच्या स्थितीबाबत ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा मानतो आणि ड्रूमच्या या उपक्रमाच्या तांत्रिक आधुनिकीकरणाच्या बाबत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहोत.”