मुंबई, 22 मे : सध्याच्या कोव्हीड-१९ संसर्गावर मात करण्यासाठी ड्रूमने नुकतेच सी कॉमर्स सर्व्हिसची घोषणा केली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलवजावणी करण्याकरिता ड्रूमने संपूर्ण भारतभरात ही सेवा सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणजे ड्रूम आपल्या ग्राहकांना वाहनांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी ड्रूम डिस्कव्हरी, ओबीव्ही, ड्रूम हिस्टरी आणि ईसीओ इन्स्पेक्शन यासारख्या ऑनलाइन सर्वसमावेशक साधनांचा वापर करण्याची परवानगी देत आहे. तसेच यानंतर घरपोच टेस्ट ड्राइव्ह आणि होम डिलिव्हरी किंवा टूर होम किंवा घरपोच वाहन प्रमाणन या सुविधाही दिल्या जातील. यासोबतच ड्रूम पूर्णपणे ऑनलाइन पेमेंट पद्धती आणि ऑटोमॅटेड आरसी रजिस्ट्रेशन, आरसी ट्रान्सफर आणि ट्रान्झॅक्शन क्लोझर इत्यादी सुविधाही दिल्या जात आहेत.
या नव्या उपक्रमात ड्रूमला आधीच १० हजार कोटी रुपयांच्या १.२५ लाख नव्या नोंदणी मिळाल्या आहेत. जीएमव्हीमध्ये लिस्टेड अशा यात विविध शहरांमधील हजारो डिलर्स आणि वैयक्तिक विक्रेत्यांचा यात समावेश आहे. भारतातील १ हजारपेक्षा जास्त शहरांमध्ये ड्रूमची उपस्थिती असून यात ३ लाख ५० हजारांपेक्षा जास्त ऑटो डिलर्स आहेत. सध्या ड्रूमवर दरमहा ४५ दशलक्षांपेक्षा जास्त व्हिजिटर्स भेट देत आहेत.
ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले, ‘ड्रूमने मागील ६ वर्षे आणि हजारो, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत १०० वर्षांपासूनच्या ऑटोमोबाइल क्लासिफाइड कॅटेगरीचे ऑनलाइन ई कॉमर्स ट्रान्झॅक्सनल कॅटेगरीत रुपांतर केले. या काळात आम्ही प्लॅटफॉर्म, तंत्रज्ञान, ग्राहकांच्या अनुभवात प्रगती केली. यासोबतच ५ लाखांपेक्षा जास्त वाहनांची विक्री केली. एवढ्याच संख्येने कर्ज, विमा, दुरुस्ती, इन्स्पेक्शन, आदी व्यवहार केले. तेदेखील १०० टक्के ऑनलाइन वातावरणात. कोव्हीड-१९ महामारीमुळे ग्राहकांच्या भावनांचे अपरिहार्य परिवर्तन झाले आहे. आमच्या सर्वोत्कृष्ट, पूर्णपणे ऑनलाइन, संपर्कविहिन सेवेद्वारे या ग्राहकांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करता येतील.’