~ ओबीव्ही इंडस्ट्री स्टँडर्ड म्हणून उदयास आलेले यूझ्ड व्हेइकल प्राइसिंग इंजिन आहे ~
मुंबई, १ जून २०२१: ऑरेंज बुक व्हॅल्यू (ओबीव्ही) ला बाजारात भरगोस प्रतिसाद मिळाल्यानंतर, ड्रूम या भारतातील सर्वात मोठ्या आणि अग्रगण्य एआय आधारीत ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटप्लेसने, ऑरेंज बुक व्हॅल्यूच्या यशस्वी कारकीर्दीत मैलाचा दगड रोवला गेल्याचे जाहीर केले. ओबीव्हीला दर महिन्यात ७ दशलक्ष चौकशी मिळाल्या. त्यामुळे २०१६ मध्ये लाँचिंगपासून ५०० दशलक्ष क्वेरींचा आकाडा पार करणारे हे, वापरलेल्या वाहनांकरिताचे, भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील एआय आणि डेटा सायन्स आधारीत प्राइसिंग इंजिन बनले आहे.
ओबीव्ही हे ३८ देश, ७ चलन आणि ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. वापरलेल्या वाहनांच्या व्यवहार क्षेत्रात याने गेम-चेंजरची भूमिका बजावली असून याच्या मूल्यांकनाच्या कक्षेत वाहनांच्या विस्तृत श्रेणी येतात. यात कार, मोटरसायकल, स्कूटर, सायकल आणि विमानांचाही समावेश आहे. मागील 18 ते 20 वर्षांमध्ये उत्पादित झालेले वाहनांचे ४००+ प्रकार, १०००+ मॉडेल्स, १००+ मेक्सचे ८०,०००+ युनिक उत्पादने याअंतर्गत येतात. ओबीव्ही स्वीकाराच्या सर्वेक्षणानुसार, जवळपास ८५% प्रतिसादकांनी दावा केला की, विक्रीकरिता खरेदी केलेल्या वाहनांचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी ते पूर्णपणे आणि स्वतंत्रपणे ओबीव्हीवर अवलंबून आहेत.
ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ, संदीप अग्रवाल म्हणाले, “जलद शहरीकरणामुळे ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत. इंटरनेटचा वापर वाढत आहे. अशा स्थितीत भारतातील पूर्व मालकीच्या ऑटोमोबाइल बाजारपेठेत डिजिटायझेशनचा स्वीकारही वेगाने होत आहे. यामुळेच, ओबीव्हीने ओलांडलेली ५०० दशलक्ष क्वेरीची आकडेवारी मैलाचा दगड ठरली आहे. ओबीव्ही कोणत्याही वापरलेल्या वाहनाचे स्वतंत्र, वस्तुनिष्ठ आणि नि:पक्षपाती वाजवी बाजारमूल्य सांगते आणि वापरलेल्या वाहनांसाठीचा वेळ आणि किंमत कमी करते. याद्वारे खरेदी आणि विक्रीही खूप सोपी केली आहे. ओबीव्हीने दिलेला किंमतीचा अंदाज हा सध्याचा इंडस्ट्रीतील मानक आहे. खरेदीदार, विक्रेते, लाखो ऑटो डीलर, अनेक बँका, एनबीएफसी आणि विमा कंपन्यांनी यावर पूर्ण विश्वास ठेवला असून यामुळेच या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता प्रचंड वाढत आहे.”