Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते काल (दिनांक ८ जून २०२२) भांडुप संकुल येथील सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजीव कुमार यांना महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाच्या वतीने “गार्ड ऑफ ऑनर” ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री. अजित तावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.