
रत्नागिरी : जायंटस् ग्रुप आॅफ रत्नागिरी पुरस्कृत जायंटस् ग्रुप आॅफ मनकर्णिका सहेली ग्रुपचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. डॉ. निशिगंधा पोंक्षे या ग्रुपच्या अध्यक्ष असून या ग्रुपच्या माध्यमातुन महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील असे प्रतिपादन यावेळी केले.
या शपथविधी व पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहूण्या म्हणून रत्नागिरी एज़्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन उपस्थित होत्या. जायंटस् वेलफेअर फाऊंडेशन, फेडरेशनचे अध्यक्ष संजय पाटणकर, फेडरेशनचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद सावंत, फेडरेशनचे उपाध्यक्ष भूषण मुळ्ये, पीआरओ प्रविण डोंगरे, फेडरेशन आॅफिसर राजेश गांगण, युनिट संचालक धीरजलाल पटेल यावेळी उपस्थित होते. पटवर्धन यांनी या महिलांच्या ग्रुपचे कौतुक करताना यातील प्रत्येक महिला सदस्याची स्वत:ची वेगळी ओळख आहे. त्या सगळ्याजणी एकत्र येणे हे समाजासाठी आणि विशेषत: महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. मिलिंद सावंत, भूषण मुळ्ये, संजय पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त करून महिला ग्रुपला शुभेच्छा दिल्या. मनकर्णिका सहेली ग्रुपमध्ये अध्यक्षा डॉ. निशिगंधा पोंक्षे यांच्यासह उपाध्यक्षा अनघा निकम- मगदूम, रसिका तेरेदेसाई, सचिव पर्णिका मुळ्ये, खजिनदार दया भिडे, कार्यकारणी सदस्य सुजाता साळवी, शुभदा पटवर्धन, ऋता पंडित तर सदस्यपदी जयश्री जोशी, कु. प्रणाली तोडणकर, श्रुती दात्ये, शर्वरी भिडे, श्रध्दा तेरेदेसाई, स्नेहल भट, धनश्री लकेश्री, श्वेता जोगळेकर यांची निवड करण्यात आली आहे.