मुंबई, (निसार अली) : पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 132 व्या जयंती निमित्त दिनांक 22 रोजी सप्टेंबर सकाळी ठीक 8 वाजता रयत शिक्षण संस्थेचे “ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप कांदिवली (प) या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशांच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत मिरवणूक काढण्यात आली .
मिरवणुकीस स्कूल कमिटी सदस्य हणमंतराव नलावडे, महादेवराव भिंगार्डे महाराष्ट्र शासनाचे प्रशासकिय अधिकारी अॅड .अशोकराव चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष घनःशाम देटके, पालक , शाळेचे मुख्याध्यापक हणशी सर, शिक्षक, सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी मॅजिक बस फाउंडेशन कडून विद्यार्थ्यांना ‘ रोबोटीक किट ‘ देण्यात आला.