मुंबई : बांधकाम आणि वॉटरप्रफिंग तज्ज्ञ डॉ. फिक्सिटने इमारतीचे थर्मल इन्सुलेनश अधिक चांगले व्हावे यासाठी बिल्डींग एन्व्हलप उत्पादन लाँच केले आहे. या लाँचच्या मदतीने या ब्रँडला कमी उर्जा वापरणारी यंत्रणा मजबूत करायची असून पारंपरिक उत्पादनांऐवजी आधुनिक उपाययोजनांचा प्रचार करायचा आहे.
बिल्डींग एन्व्हलप म्हणजे बाह्य भिंती, खिडक्या, छत आणि मजला. इमारतीच्या इन्व्हलपमध्ये विशेषतः छत आणि भिंतींचा इमारतीतील उर्जा कमी करण्यात २८ टक्के आणि ४५ टक्के वाटा असतो. एन्व्हलपसाठी चांगले थर्मल इन्सुलनेशन (उष्णता दूर ठेवण्यासाठी) इमारतीच्या बाह्य भागातून उष्णता झिरपण्यास प्रतीबंध करण्यासाठी अतिशय आवश्यक असते. दुर्देवाने बहुतेक इमारतींच्या बिल्डींग एन्व्हलपमध्ये पुरेसे थर्मल इन्सुलेनशन नसते आणि त्यामुळे उर्जेचा अनावश्यक वापर, कार्बन उत्सर्जन आणि इमारतीचे एकंदर आयुर्मान कमी होते.
कमी उर्जा वापर यंत्रणेच्या विस्तृत श्रेणीमध्ये डॉ. फिक्सिट एलईसी यंत्रणा, डॉ. फिक्सिट ब्लूसील यंत्रणा, कमी वजनाचे काँक्रीट, अंडर रूफिंग उत्पादने यांचा समावेश आहे. भिंतींसाठी स्मार्ट वॉल इन्सुलनेश फिनिशिंग सिस्टीम (एसआयएफएस), एक्स्टर्नल इन्सुलेटेड फिनिशिंग सिस्टीम (ईआयएफएस) आणि कमी वजनाचे वॉल प्लॅस्टर यांचा समावेश आहेय या यंत्रणा अधिक चांगले इन्सुलेशन पुरवून उर्जेचा एकंदरीत वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करून इमारतीचे आयुर्मान वाढवतात.
डॉ. संजय बहादूर, जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम रसायने विभाग, पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. म्हणाले, ‘नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त तंत्रज्ञान पुरवून भागधारकांना आनंद देण्याचा तसेच पर्यावरणाला जपण्याचा आम्ही कायमच प्रयत्न केला आहे. भारतातील बहुतेक भागांत उर्जा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने उर्जेच्या बाबतीत कार्यक्षम असलेली आणि शाश्वत आराखडा तयार करण्यासाठी योग्य असलेली सर्वसमावेशक उत्पादने बनवणे महत्त्वाचे आहे. या लाँचसह डॉ. फिक्सिटने ग्राहकांना उर्जा कार्यक्षम उत्पादने पुरवण्याचे आणि त्याद्वारे असामान्य कामगिरी व शाश्वत आराखडे कायम राखले जातील याची खात्री करण्याचे ध्येय ठेवले आहे.’