मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता हे प्रसारण होईल.
बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारीत या चित्रपटाची निर्मिती केंद्र सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली आहे. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शोषीत, वंचित वर्गासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षावर आधारीत हा चित्रपट विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे. विविध भाषांमधून हा चित्रपट देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यत पोहोचला आहे. येत्या मंगळवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मराठी भाषेतून डबींग केलेल्या चित्रपटाचे प्रसारण होणार आहे