मुंबई, (निसार अली) : समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव बालरोगतज्ञ डॉ. अजय जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 78 व्या वर्षी पुणे येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कांचन, एक मुलगा व मुलगी आहे.
बालरोगतज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. ससून रुग्णालयाच्या बाल रुग्ण विभागाचे प्रमुख म्हणून ही त्यांनी काही काळ काम पाहिलं.
गोर गरीब, ग्रामीण भागातील आणि समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुलांचे ते विशेष लक्षपूर्वक उपचार करायचे, अशी माहिती ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे यांनी दिली.
त्यांच्या मृत्यू मुळे एक कर्तृत्ववान व्यक्ती समाजातून हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. आज दुपारी एकच्या दरम्यान वैकुंठ स्मशानभुमी, पुणे येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या वेेळी शेकडो सामाजिक कार्यकर्ते सहभाागी झाले होते .