![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/11/doordarshan1-300x167.jpg)
मुंबई : दूरदर्शन केंद्रात काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने दूरदर्शन कार्यालयावर नुकताच मोर्चा काढला. शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, नगरसेवक आरविंद भोसले आणि शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष अभिनेते सुशांत शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
दिल्लीवरून आलेल्या कमिटीने हंगामी कर्मचाऱ्या काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात शिवसेनेने आवाज उठविला आहे. हंगामी कर्मचाऱ्याचा मानसिक छळ या ठिकाणी सुरू आहे. गर्भवती हंगामी महिला कर्मचाऱ्याना सुट्टी दिली जात नाही. नऊ महिने त्यांना कामावर येण्याची सक्ती केली जाते आणि एखादीने सुट्टी मागितली तर कायमची सुट्टी घेवून घरी बसा असे सांगण्यात येते. कर्मचाऱ्याना दहा ते १५००० हजार वेतन देवून पर्णवेळ राबवले जाते. कोणत्याही प्रकारचा पीएफ, वैद्यकीय अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. असे यावेळी हंगामी कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी शिवसेनेकडून एक निवेदन दूरदर्शनच्या संचालकाना देण्यात आले. तरिही ते ऐकत नसतील तर आंदोलन आणखी तीव्र करू, असे सुशांत शेलार यांनी सांगितले