
दुधाला तीस रुपये हमीभाव मिळावा या मागणीसोबत अन्य मागण्यांंसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे.
दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर मिळावा, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन असेल. गावोगावी रोज सकाळी आणि संध्याकाळी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा
दुधाला प्रति लीटर तीस रुपये दर मिळावा, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा, तसेच दुधाला रास्त भाव मिळावा यासबरोबर सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर दहा रुपये अनुदान वर्ग करण्यात यावे, इत्यादी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे आदी यावेळी उपस्थित होते.