मुंबई, 22 जुलै : इदुल अज़हा(बकरी ईद)ला कुर्बानीची परंपरा आहे. म्हणूनच कोरोनातून मुक्त झालेल्या तरुण तरुणींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन राष्ट्र सेवा दल आणि मुस्लिम युवक युवतींनी केले आहे. यंदा कोरोना मुळे जगभर संकट आहे. आपला देशही याला अपवाद नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या वाढते आहे. 1 ऑगस्टला बकरी ईद आहे. या निमित्ताने प्लाझ्मा दानचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक जण जगण्याचा संघर्ष करीत आहेत. तरीही या देशासाठी, या समाजासाठी काही तरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती तरुणी आणि तरुणांमध्ये आहे. यंदाच्या इदुल अज़हा(बकरी ईद)ला कोरोना रुग्णाला बरे करण्यासाठी आपण प्लाझ्मा दान करूया, असे या निमित्ताने सांगण्यात आले आहे
कुरबानीचा अर्थ आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या गोष्टीचा त्याग करायचा. रक्त आणि रक्तातले घटक आपल्या जीवनासाठी सर्वोच्च महत्वाचे असतात. त्याचा त्याग केल्याने समाजाचे काही भले होणार असेल तर यासारखा दुसरा आनंद नाही. आजच्या तारखेला जे बहाद्दर कोरोनाचा सामना करत बरे झाले आहेत (निगेटिव्ह झाले आहेत) त्यांच्या रक्तात असलेल्या प्लाझ्मातील अँटीबॉडीज सध्या कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तीला कोरोनामुक्त होण्यास सहाय्य करतात. म्हणून आपल्यातील जे कोरोनापासून बरे झाले आहेत ते प्लाझ्माचे दान करतील व काही जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतील. आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनीही या राष्ट्रकार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन आहे.
प्लाझ्मा डोनेशन करावयाचे असेल तर संपर्क :
मुंबई, मालाड येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते निसार अली सय्यद : 9967518107,
महाराष्ट्रातील विविध भागात सामाजिक काम करणारे कार्यकर्ते
सोहेल डॉलरिया, मालेगाव -9823087860/9226788042,
अन्वर पठाण, मालेगाव -9420892647 ,
नासिर शरीक मसलत, मिरज 9421223603 ,
ताहीर शेख, इचलकरंजी,जिल्हा कोल्हापूर -8007867313
पुणे शहरातील समाजसेवी कार्यकर्ते पैगंबर शेख 9970070705