रत्नागिरी, (आरकेजी) : लांजा तालुक्यातील कोर्ले येथील मुचकुंदी नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. बुडालेले दोघे मुंबईतील खासगी कॅमेरामन होते ते एका लग्नाच्या शुटिंगसाठी कार्ले गावात आले होते. मुकेश मकवाना (३२) आणि बंटू जाला(१९, दोघेही राहणार जोगेश्वरी पूर्व) अशी त्यांची नावे आहेत.
लग्नाच्या कार्यक्रमासाठी कोर्ले गावात मुंबईतून काही जण आले होते. त्यापैकी मुकेश आणि बंटूसह त्यांचे मित्र अल्पेश परमार, रणधीर राय असे चौघे अंघोळीसाठी नदीवर गेले होते. मुकेश आणि बंटू खोल नदी पात्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. ग्रामस्थ मदतीला येणाच्या आतच काळाने दोघांवर घाला घातला.