डोंबिवली, (प्रशांत जोशी) : डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाटाची ऊंची वाढविणे आणि जिन्यावरील लाद्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. फलाटावर नवीन लागलेल्या लाद्या आठ दिवसातच तुटल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून येत आहेत. विशेष म्हणजे नव्या लावलेल्या लाद्यांना तडे गेले आहेत. देखभाल दुरुस्ती म्हणून जरी लादी बसवण्याचे काम सुरु असले तरी ते काम निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी प्रवासी करत आहेत.
कल्याण दिशेकडील पूलावर लादी बसण्याचे काम करण्यात आले. तसेच मुंबई दिशेकडील पूलावर लाद्या बसवण्यात आल्या आहेत. दरम्यान सध्या फलाट क्रमांक पाच वरील जिन्याच्या लाद्या बसवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कल्याण दिेशेला असलेल्या जून्या पूलावरील लाद्या बसवून काही दिवस झाले असून त्या लाद्यांना तडे गेले आहेत.
याबाबत डोंबिवली रेल्वे स्थानकाचे महाव्यवस्थापक के. ओ. अब्रहम यांनी सांगितले कि, प्रवाशांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांची दखल घेतली असून ज्या लाद्या तुटल्या आहेत त्या बदलून दुसऱ्या लावण्यात आल्या आहेत. जिन्यावर ज्या लाद्या बसवण्यात येत आहेत त्या ग्रेनाईडच्या असून वेल्डिंग पटटी लावून त्यावर ग्रेनाइड लादी बसवण्यात येत असून हे काम येाग्य पध्दतीने केले जात आहे. तर रेल्वेचे अभियंते दिपक पाटील यांनीही प्रवाशांच्या लाद्या बसवण्याबाबतच्या तक्रारी आल्याचे मान्य केले.