डोंबिवली : भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर जो जोरदार हल्ला केला. त्याबद्दल डोंबिवली शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आला. भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या जल्लोषात शिवसैनिकांनी भारतमाता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणा देण्यात आल्या.
प्रारंभी राजेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. नंतर शिवसेना झिदाबाद, भारत माता की जय, भारतीय सैन्याचा विजय असो पाकिस्तान मुर्दाबाद, हमसे जो टकरायेगा आदी घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, संजय पावशे, विभाग प्रमुख अमोल पाटील, धनाजी चौधरी, महिला आघाडी संघटक कविता गावंड यांचेसह शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर पूर्वेकडील फडके रोडवर मनसेतर्फे फटाके उडवून जल्लोष करण्यात आला. भारतीय सैन्यदल, एअरफोर्सचे अभिनंदन करत ‘सूनले बच्चा पाकिस्तान, बाप हे तेरा हिंदुस्थान’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम, सागर जेधे, शशिकांत कोकाटे, सुदेश चूडनाईक यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.