डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागात गेले पंधरा दिवस विजेचा लपंडाव सुरु असून यामुळे उद्योजक अस्वस्थ आहेत. यामुळे उत्पादन घटले आहे. उद्योजकांना अखंडित वीज पुरवठा होण आवश्यक असताना अचानक वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे उद्योजकांना माल वेळेवर न गेल्याने दंड भरावा लागत आहे अशी तक्रार उद्योजक करत आहेत.
याबाबत उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार गेले काही दिवस सकाळचे सत्र सुरु होताच वीज पुरवठा खंडित होतो. तो पुन्हा कधी येणार हे सांगता येत नाही. यामुळे कामगार बसून असतात. उत्पादन घटते मुख्य म्हणजे रासायनिक उत्पादन खराब होते. यामुळे उद्योजकांचे प्रचंड नुकसान होत असून वीजेअभावि उद्योजकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यांसदर्भात उद्योजक व ‘कामा’ या संघटनेचे सदस्य श्रीकात जेाशी यांना विचारले असता त्यांनीही गेले काही दिवस वीज पुरवठयामुळे उद्योजकांचे मोठेच नुकसान होत असून यामुळे उद्योजकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे मान्य केले.
यासदर्भात कल्याण डोंबिवली विभागाचे अधिक्षक अभियंता सुनिल काकडे यांना विचारले असता त्यानीही काही कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे मान्य केले व शुक्रवारी 5 तारखेला वीज पुरवठा खंडित ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.