मुंबई : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणा-या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना त्या बरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेत स्थळावर याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचे जेनेरिक नावे वाचण्यास योग्य व प्राथम्याने कॅपिटल लेटरमध्ये नमुद करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी कळविले आहे.