
मुंबई : डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधील दरी भरून काढत उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २०१५ मध्ये डॉक्सअॅपने सुरुवात केली आणि आज या उपक्रमाला उदंड प्रतिसादासह ४ वर्षे पूर्ण होत आहेत. सामान्य शारीरिक व्याधींसोबतच ज्या समस्या उघडपणे बोलल्या जात नाहीत अशा सर्व समस्यांवर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. डॉक्सअॅपच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त ‘बाततोकरो’ या मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्ण त्यांच्या न बोलल्या गेलेल्या समस्या मुकाट्याने सहन न करता सहजपणे बोलू शकतील व उपचार घेऊन बरे होऊ शकतील.
डॉक्सअॅपच्या माध्यमातून आजवर १ कोटीपेक्षा जास्त भारतीय जनतेला वैद्यकीय मदत पुरवली गेली आहे, आणि यासाठी ३०० हुन अधिक कर्मचारी आणि ५००० हुन अधिक डॉक्टर्स हे २० वैद्यकीय शाखांमधून उपचार पुरवण्यासाठी अविरत कष्ट करत असतात. यासोबत आमच्या लाखो वापरकर्त्यांचाही यामध्ये सहभाग आहे ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या समस्यांचे निराकरण आमच्याकडून केले आहे.
डॉक्सअॅपचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सतीश कनन म्हणाले की, ‘ आज सेवेची ४ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. ‘बाततोकरो’ या मोहिमेद्वारे आम्ही जनतेला त्यांच्या समस्यांबद्दल बोलण्यास प्रोच्चाहीत करत आहोत. ज्या समस्या उघडपणे बोलल्या जात नाही, ज्या समस्यांवर बोलणे हे गरज नसतानाही निषिद्ध समजले जाते अशा समस्यांबद्दल बोलून त्यावर समाधान मिळवण्यासाठी हि मोहीम सुरु केली आहे.















