मुंबई, 19 मे : सध्या देशभर लॉकडाऊन सुरु असले तरी घरातील विविध कामे सुरुच आहेत त्यातच जिम बंद असल्याने स्नायूमध्ये वेदना निर्माण होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. अशावेळी एका वैयक्तिक फिजिओथेरपिस्टच्या रूपात काम करेल अशा बॅक मसाजिंग रोबोट व्हीम २०२०ची निर्मिती रोबोटिक्स ब्रँड मिलाग्रोद्वारे करण्यात आली आहे. पाठदुखीचा त्रास असलेल्यांसाठी हे अधिक प्रभावी आहे.
४५ अंशांपेक्षा कमी कोनात पकडला असताना त्यावरील पकड कमी होऊन ते हातातून घसरू नये यासाठी टिल्ट सेंसर टेक्नोलॉजीयुक्त असे मिलॅग्रो व्हीम २०२० हे हळूवार मसाज करते. रोलिंग मोशनद्वारे चालणारे व्हीम हे जगातील पहिले रोबोटिक मसाजर असून यात तीन वेगवेगळ्या सेटिंग्स वापरकर्त्यांना निवडता येतील. यात व्हायब्रेशन मसाज, लाईट टिकलींग मसाज (हलक्या प्रमाणात गुदगुदल्या) आणि आणि सौम्य दबाव मसाजचे पर्याय उपलब्ध आहेत. रोबोटद्वारे करण्यात आलेला मसाज स्नायू शिथिल करण्यास, रक्त परिसंचरण सुधारण्यासह तणावमुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरतो. हे उत्पादन कंपनीचे संकेतस्थळ मिलाग्रोह्युमनटेक डॉटकॉमवर उपलब्ध आहे.
या मसाजरची मूळ किंमत ११,९९० रुपये आहे. मिलाग्रो क्राउडफंडिंगचा लाभ घेत आहे ज्याद्वारे हे उत्पादन सध्या २,९९० रुपयांत उपलब्ध असेल. क्राउड फंडिंग १९ मे पासून १ आठवड्याकरिता उपलब्ध असून असून २५ मे रोजी ऑनलाइन ऑर्डर घेणे बंद करण्यात येईल. १५ दिवसात या रोबोटचे वितरण करण्याची कंपनीची योजना आहे.
मिलाग्रो रोबोट्सचे संस्थापक अध्यक्ष राजीव करवाल यांनी सांगितले की, ‘सध्याच्या काळात स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी घरातच राहण्याची गरज आहे. अशा स्थितीत व्हीम २०२० हे पाठीचे दुखणे असणाऱ्यांसाठी तसेच स्नायूमध्ये वेदना असलेल्यांसाठी वैयक्तिक फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करेल. ‘महामारीनंतरच्या जगगात रोबोट हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनेल. मग घरातील कामांसाठी असो वा व्यावसायिक जगात वारंवार कराव्या लागणा-या कामांसाठी त्यांचा वापर होईल. अनेक लोकांना खरेदी करण्यासाठी किंमत हा अडथळा ठरू शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आमचे क्राउडफंडिंग या उद्योगांना विकसित आणि प्रासंगिक उत्पादने निर्मितीत मदत करेल.’