मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्ञानज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन केले. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित सहकार मंत्री सुभाष देशमुख, अपर मुख्य सचिव डॉ . भगवान सहाय यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अन्य मान्यवर, अधिकारी आदींनीही ज्ञानज्योती सावित्रीबाईंना अभिवादन केले.