डोंबिवली : डोंबवली नागरी सहकारी बॅंकेच्या ६८ व्या शाखेचे उद्घाटन येत्या १५ जुलै रेाजी बावधन (पुणे) येथे होणार आहे. सदर शाखा येत्या १५ तारखेला कार्यान्वीत होत असून या शाखेत ई – लोंबीची सुविधा उपलब्ध केली आहे. बँकेच्या पुणे शहरात कोथरुड, सिंहगड रेाड व मारुंद येथे शाखा कार्यरत आहेत.
बॅंकेच्या विविध आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी या शाखेला भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष उदय कर्वे यानी केले आहे. बँकेने 7700 कोंटींचा टप्पा ओलांडला असून लवकरच खोणी, तळोजा रेाड येथेही शाखा शुभारंभ होणार असल्याचे त्यानी सांगितले.