डोंबिवली : सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 120 संस्थांना डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. तसेच समाज मित्र पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, परिवर्तन महिला संस्था डोंबिवली यांना तर सहकार मित्र पुरस्कार डॉ. नंदकिशेार लाड, शुश्रुषा सिटीझन्स यांना प्रदान करण्यात येणार आहे.
23 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुयोग मंगल कार्यालयात होणाऱ्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे उपस्थित रहाणार आहेत. नागरिकांनी मोठया सख्येने या कार्यक्रमास यावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांनी केले आहे.