डोंबिवली(प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महापालिकेचा सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव ऐन दिवाळी सुटटीच्या तोडावर किमान 15 दिवस दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्याची व पोहेाणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होणार आहे. डोंबिवलीत एकूण तीन तलाव असून डोंबिवली जिमखान्याचा तरण तलाव केवळ सभासदांसाठी राखीव आहे.
क्रीडा संकुलातील तरण तलावीतल फिल्टर प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देण्यात येत आहे गेले काही दिवस तलावातील पाणी गढूळ होत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर प्लँन्टची दुरुस्ती होईपर्यत किमान 15 दिवस तलाव बंद ठेवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या 4 नोव्हेंबरपासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सुट्टी सुरु होत असून या काळात शालेय विद्यार्थी पोहायला शिकण्यासाठी येत असतात सुट्टीच्या तोडांवर तलावातील पाणी शुध्दीकरण केंद्रात बिघाड झाल्याने काही अपघात होऊन दुर्घटना होऊ नये म्हणून तलाव बंद ठेवण्याचा निर्णय धेण्यात आला. फिल्टर प्लँटमधील पाणी शुध्द करणारी रेती पाच वर्षापूर्वी टाकण्यात आली होती ती आता खराब झाल्याने पाण्यात येत असून त्यामुळे पाणी खराब होत आहे. यामुळे तलाव बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता असे कनिष्ठ अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगीतले. किमान यासाठी 15 दिवस लागणार असून दिवाळी संपल्यावर कामाला प्ररंभ करण्यात येईल असेही त्यानी सांगीतले. जर तलाव बंद केला नाही तर अपघात होण्याची भिती असून पाण्यात गेलेले दिसत नाही इतके पाणी खराब होते असेही त्यानी सांगीतले.
डोंबिवली जिमखान्यात गुरूवारपासून सुरु :
दरम्यान डोंबिवली जिमखान्याने दिवाळी सुटटीनिमित्त पोहोण्याचे विशेष प्रिशक्षण 1 तारखेपासून सुरु केले असून मासिक फी 1400 तर दोन महिन्यांची फि 2600 रुपये इतकी ठेवली आहे अशी माहिती अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक यांनी दिली. सुट्टी व्यतिरिक्त जिमखान्याचा तरण तलाव केवळ सभासदांसाठी आहे असेही त्यानी सांगीतले.