
मुंबई : दिशा वेल्फेअर ग्रुपतर्फे १५ ऑगस्ट २०२२ रोजी गजानन महाराज चौक,कन्नमवार नगर ,विक्रोळी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय उत्सवात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण मॅडम व त्याचे सहकारी तसेच विक्रोळी वाहतूक विभाग चे प्रभारी हुसेन जतकर साहेब व त्याचे सहकारी आणि सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दुपारी १.३० वा राष्ट्रगीताने या उत्सवाची सांगता करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेश बैरीशेट्टी सरांनी उपस्थितांचे आभार मानले.
















