मुंबई(शांताराम गुडेकर) : कोकणातील माणसाच्या कणाकणात आणि मनामनात भरलेली कला म्हणजे शक्तितुरा जो पुराण काळापासून आदी अनादी ही कला हे नृत्य पाहायला वाचायला मिळत आहे.शिवरत्न प्रोडक्शन निर्मित सुभाष बांबरकर सह सख्खे शेजारी ग्रुप आयोजित कोकणचा मराठमोळा असा शक्ती -तुरा. कोकणातील दोन युवा दिग्गज शाहिरांचा “शक्ती-तुरा”जंगी सामना ” शक्तिवाले सदालाल घराणे शिवशाहीर विठोबा साळवी, शाखा-स्वर – तरंग कला मंच, ता. जि. रत्नागिरी, निर्माता समीर बलेकर,शाहीर सौ. संगिता पांचाळ विरुद्ध मुलकवी बाबू रंगेले घराणे, महाराष्ट्र गौरव भूषण कवी शाहीर मधुकर पंदेरे, केळवली,ता. लांजा, जि. रत्नागिरी,तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे यांचा जबरदस्त सामना गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्रौ ०८-३० वा. मुंबईतील प्रसिद्ध मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले पूर्व येथे होणार आहे.तरी कोकणभुमिपुत्रांनी या शक्ती-तुरा सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.