
मुंबई : कोव्हिड -१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत होऊ घातलेल्या बँकांच्या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालकीच्या भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या व्यवस्थपकांना डिजिटल ट्रेनिंग देण्याची तयारी सुरु केली आहे.
कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँकेसोबत युनियन बँकेचे लवकरच विलीनीकरण होईल. त्यामुळे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह, शाखा व्यवस्थापक तसेच शाखेतील कर्मचारी यांच्या एकत्रिकरणातून उभ्या राहणा-या नव्या बँकेची धोरणे, प्रक्रिया आणि उत्पादनांसाठी सज्ज रहावे, याकरिता बँकेतर्फे विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे.
ट्रेनिंग क्लासरुमऐवजी युनियन बँकेने ई लर्निंग मॉड्यूल्सची सिरीज विकसित केली आहे. शाखा व्यवस्थापक आणि इतर एक्झिक्युटिव्ह्जसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल कोलॅबोरेशन टूल्स तसेच व्हिडिओद्वारे विशेष प्रशिक्षण घेत आहेत.या प्रशिक्षणासाठी एक खास समर्पित वेबसाइटदेखील तयार करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय लॉकडाउनचे पूर्ण नियम पाळले जात आहेत तसेच त्याच वेळेला ७५,००० पेक्षा जास्त कर्मचारी पहिल्या दिवसापासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज असतील, अशी आशा बँकेला आहे.
५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट समोर ठेवलेल्या सरकारला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने नव्याने एकत्रित झालेली बँक विविध प्रकारची उत्पादने लाँच करणार आहे. तसेच नव्या युगातील भारतीयांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ही वापर करणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या काळात एकत्रिकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचा-यांना डिजिटली प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरून जगभारीतल ग्राहकांना डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करता येतील तसेच ग्राहकांना या प्रक्रियेत कोणतेही अडथळे येणार नाहीत, याची हमी घेतली जात आहे.
















