डोंबिवली : समग्र उत्थान संस्थेचे अॅड. प्रकाश पांड्ये आणि सेमिनारचे आयोजक विकास पांड्ये यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह मुक्त धरा अभियान चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सदर अभियान कल्याण येथे होणार असून विश्वप्रसिद्ध नक्षत्र अभ्यासक ज्योतिषाचार्य तथा माजी तुरुंगाधिकारी डॉ. शंकरचरण त्रिपाठी, आधुनिक चिकित्सक विज्ञानच्या वरिष्ठ डॉ. वंदना झा यांच्या संयुक्त प्रयासाने तसेच प्राचीन वेदांच्या मुलभूत सिद्धांतांचा आधार घेऊन मधुमेह मुक्त धरा पद्धतीची निर्मिती झाली आहे.
मधुमेह मुक्त धरा अभियान अंतर्गत चर्चासत्र कल्याण स्पोर्ट क्लब येथे रविवार दि. 7 जुलै, 2019 रोजी दुपारी 4:00 वाजता होणार असून या चर्चासत्रात आयोजक उद्योजक विकास पांड्ये, संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर पांड्ये, समाजसेवक कांतिभाई पांड्ये, चित्रपट निर्माता नीरज पाठक, उद्योजक संजय गुप्ता, समग्र उत्थान संस्थेचे अॅड. प्रकाश पांड्ये उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्राबात विकास पांड्ये म्हणाले, देशभरातील 821 डॉक्टरांना मधुमेह मुक्त धरा अभियान माध्यमातून मधुमेह आजारातून कायमचे मुक्त करण्यात आले आहे. मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मधुमेह पूर्णपणे हद्दपार झाला पाहिजे यासाठी या प्रकारचे अभियान घेण्यात येत आहे. मधुमेह मुक्त धरा अभियान उपक्रम संपूर्णपणे मोफत असून या चर्चासत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पांड्ये यांनी केले आहे.